Thursday 9 February 2023

What should I prefer, a higher salary with management experience or new technology learning experience with less salary?


Higher Salary vs Tech Learning


dilip bansode
What should I prefer, a higher salary with management experience or new technology learning experience with less salary?

The answer to this question ultimately depends on your personal and professional goals, as well as your long-term career aspirations.

If you're looking to build a strong foundation in management and leadership skills, a higher salary with management experience could be a good choice. This will give you the opportunity to learn on-the-job and develop your skills in a real-world setting. Additionally, a higher salary can provide financial stability and security, which can be valuable for many people.

On the other hand, if you're more interested in staying on the cutting edge of technology and developing new skills, a role that offers the opportunity to learn new technologies and work with cutting-edge tools could be a better fit. This kind of role may also provide opportunities for personal and professional growth and allow you to develop new skills that could be valuable in future job searches.

In the end, you'll want to consider your priorities and weigh the trade-offs between salary, experience, and professional growth. It's also important to consider other factors such as the company culture, benefits, and long-term career prospects when making your decision. 

Wednesday 4 January 2023

Tuesday 7 October 2014

चित्रपटांच्या हिट होण्याचे नवीन मापके

    बॉलीवूड मध्ये सध्या नविनच ट्रेंड पहावयास मिळत आहे तो म्हणजे चित्रपटांनी कितीचा गल्ला जमवला . यावरून तो चित्रपट हिट कि फ्लॉप ठरवण्यात येते . एखाद्या चित्रपटानी १०० कोटी पेक्षा जास्त बिझनेस केला म्हणजे तो हिट . काय हे पूर्वी काय हिट चित्रपट एवढे १०० कोटीचा बिझनेस करायचे हेच कळत नाही फक्त लोकांना पाहायला जे आवडतेच फक्त  

Fandry चित्रपट निमिताने टीवी ९ वरील नागराज मंजुळे यांची मुलाखत

          नागराज मंजुळे यांच्या   मते  fandry  हि एका चळवळीची सुरुवात  असून ती जगण्याची गरज आहे . त्यांच्या  मते स्वप्न म्हणजे वास्तवाच्या विस्तवावर पाय ठेवणे  होय.त्याच्या मते चालण्यासाठी जमीन लागते. पटकथा लिहिताना त्यांना पुर्वानुभावाचा ठेवा  लागतो.  जगाला नष्ट करण्यासाठी अणुबॉम्ब निर्माण करण्यात आले आहेत परंतु जात नष्ट करण्यासाठी कोणीही निर्माण झालेला नाही . संपूर्ण चित्रपटामध्ये एकही गीत नसताना चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला  " तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला "  ह्या गाण्याबद्दल सांगताना नागराज मंजुळे सांगतात कि ते गीत त्या जब्याचे दुःख  व्यक्त करणारे गीत म्हणून तयार केले होते  परंतु रसिक प्रेक्षक त्या गाण्यावर आवर्जून ताल धरून नाचताना दिसतात म्हणजेच ते दुःखाच सेलिब्रेशन करणारे गीत झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही .
                        FANDRY  मधील कचऱ्या  आणि  त्याची  देशभक्ती  हे  चित्रपटातल्या  शेवटच्या भागावरून दिसून येते . FANDRY  ला आयता हातात आला असतानाच सुरु झालेल्या राष्ट्रगीतासाठी कचरू व त्याचा संपूर्ण कुटुंब FANDRY ला  सोडून राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी जागेवर उभे राहते . त्या भागातून कचऱ्याची  देशभक्ती दिसून आली . जो कचरू देशासाठी  हाताजवळ आलेली संधी सोडू शकतो तो देश कचऱ्याला समानतेची संधी नाही देऊ शकत हि  नागराज मंजुळेनी  कचरू आणि देश  यांच्यामधली विसंगती खेद व्यक्त करत सांगितली  . 
                    हजारो रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या FANDRY  ला  सर्वोत्कृष्ट चित्रपट , सर्वोत्कृष्ट नायक , सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक , सर्वोत्कृष्ट  बालकलाकार इत्यादी  यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले . तसेच मुंबई मधील म.टा. पुरस्कार , बंगळूर मधील GRAND ज्युरी  AWARD , लॉस एंजिलीस मधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म  यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले .

                    कार्यक्रमाची सांगता करताना  नागराज मंजुळे यांनी  भावी पिढीला जातीयता न पाळण्याचे , माणुसकी जपण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले .  FANDRY  च्या निमित्ताने फक्त इतकेच वाटते कि  देशामध्ये चाललेले जातीय वाद  , अत्याचार  नष्ट व्हावेत . प्रत्येकाला प्रगती करण्याचे अधिकार मिळाले पाहिजे . जेव्हा माणसाचा विकास होईल तेव्हाच देशाचा विकास होईल .

पर्यावरण विषयक आंदोलन

                     पर्यावरण विषयक  सर्वात शक्तिशाली चळवळ  म्हणून  "चिपको आंदोलन "  या  आंदोलनाचा उल्लेख केला जातो .  मानवी जीवनाच्या कलहात निर्माण झालेल्या धोक्याला दिलेली हि एक सुधारणावादी प्रतिक्रिया होय .  हिमालयाच्या दक्षिण टेकड्यांमध्ये वसलेल्या दुर्गम खेड्यांमध्ये तलागालाच्या पातळीवर हि पर्यावरणवादी चळवळ सुरु  झाली .  या खेड्यांमध्ये जंगलतोडीमुळे पुराचे प्रमाण वाढत  होते मात्र या खेड्यांतील लोकांना भव्यदिव्य हिमालयाबद्दल आदर होता . तिथे असणाऱ्या  जंगल संपत्तीचा अभिमान होता.

                     पहिले चिपको आंदोलन १९७४ साली हिमाचल प्रदेशातील गढवाल जिल्ह्यातील " रेनी "  नावाच्या खेड्यांत घडून आले . " गौरादेवीच्या " नेतृत्वाखाली व सुंदरलाल बहुगुणा यांच्या मार्गदर्शनाखाली खेडूंत  स्त्रियांच्या गटाने झाडांना मिठ्या  मारल्या . या स्त्रियांनी एका कारखान्याने नेमलेल्या भाडोत्री  लाकूड- तोडयांना  आव्हान देऊन सांगितले कि या झाडावर कुऱ्हाड चालवण्यापूर्वी आमचा अंगावर प्रथम चालवा . रेनी हे गाव अलकनंदा नदीच्या दरीत वसलेले होते . भविष्यात येणारे पूर आणि भूसंख्यालन यापासून स्वतःचे आणि आपल्या वनांचे संरक्षण करण्यासाठी स्त्रियांनी निदर्शना हि अभिनव पद्धत अवलंबली होती .                            
  ज्यावेळी मानवाचे जीवन आणि पृथ्वीवरील पर्यावरण या दोहोंच्या अस्तित्वाला धोका पोहचून इतिहासाला खरोखरच पूर्णविराम मिळतो कि काय अशी भीती वाटत होती त्याचवेळी चिपको आंदोलनाने जीवनाचा आधारभूत असलेल्या पर्यावरणाचा आणि जंगलतोडीमुळे ज्या मानवी समूहाला धोका निर्माण होतो . त्यांचे संवर्धन करून एक नवीन आशा निर्माण केली .

मतदानासाठी राजकीय पक्ष्यांची चालेली चढाओढ

      महाराष्ट्रातील निवडणुकीन सध्या वेगळेच रंग चढू लागले आहे . निवडणुकांचा तारखा आल्याचा काही दिवस नंतरलगेच जाहिरात बाजी सुरु झाली . आम्ही जनते साठी किती काम केली . कोणती काम करणार . या विषयी सांगण्यात सर्वस्च पक्ष एकापेक्षा एक जाहिराती करण्यास सज्ज झाली आहे.

       अनेक पक्ष विशिष्ट धर्माला लक्षात घेऊन राजकारण करताना दिसत आहे . कोणी मराठी , तर कोणी गुजराती , कोण दलित अश्या वर्गाना लक्ष करून भाषण करताना दिसतायत तर कोणी कोणता धर्म श्रेष्ठ आहे . हे सांगण्यात गर्क आहे . याने काय होणार आहे ते त्यांचा माहित पण किती दिवस हे फक्त जाती धर्माचा आधारवर अजून निवडून येतील हेच कळत नाही . देशाला स्वतंत्र मिळून आज १५० वर्ष पेक्षा हि अधिक वर्ष होऊन गले तरी सामन्या जनता हि मुलभूत गरजाही हे राज करते देऊ शकले नाही .

    सामन्यांचे अजून किती दिवस वाट पाहायला लागणार आहे माहित नाही . आत जनते ला हि कळू लागले आहे . कि खर्च या राजकीय पुढार्यांना जनतेचा काही सुख दुख नाही . त्यामुळे येणारी निवडणूक हि फार निर्णायक ठरणार आहे . 

एक घाव आणि चार तुकडे



      
     २०१४ ची महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक हि अनेक अर्थाने वेगळी आहे असे चित्र पूर्वी कधी हि पाहायला मिळाले नाही असेच आहे . कारण लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रात एक हाती सत्ता हि भाजपने काबीज केल्यानंतर महाराष्ट्रात हि भाजपला दिवसा स्वप्नं  पडायला सुरवात झाली आहे . युती आणि आघाडी तुटण्याचे मुख्य कारण हे राष्ट्रवादि कॉंग्रेस असल्याचे अनेक वृत्तवाहिन्यावर ऐकण्यास पडले . पण युती व आघाडी तुटन्यामागे नेमके काय कारण असेल ते त्यांचे त्यांनाच माहित.
          शिवसेना महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या नेतृत्वा विना हि त्याची पहिलीच निवडणूक आहे . या परिस्थितीत उद्धव ठाकरे कश्या प्रकारे कार्य करतात हे पाहण्या सारखे असेल कारण ज्या बाळासाहेबांवर मराठी जनतेने विश्वास ठेवून शिवसेना पक्षाला बळ दिले ते बळ उद्धव ठाकरे किती पेलू शकतात . मराठी अस्मितेच्या मुद्यावर कश्या प्रकारे निवडणूक लढवतात हेही पाहण्या जोगे असेल.
            महाराष्ट्रात जनतेला अनेक वर्ष युती व आघाडी असेच चित्र पहावयास मिळाले परंतु हि निवडणूक सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत . अश्या वेळी जनता कोणावर विश्वास ठेवेल हे पाहण्याजोगे असेल मोदीची हवाही कमी झाल्याचे चित्र आहे.
मनसे अजूनही आपल्या पक्ष प्रमुख सोडून एक हि म्हणावा असा ओळखीचा चेहरा देऊ शकला नाही त्यामुळे मनसेचे सर्व गणित हि राज ठाकरे वर अवलंबून आहेत . तर दुसरीकडे आघाडीचे दोन तुकडे झाल्यानंतर त्यांना हि निवडणूक अग्नी परीक्षे पेक्षा कमी नसणार नाही .