Thursday, 10 October 2013

मॉल चे हाल " बेहाल "

           केनियाच्या नैरोबि येथील एका शॉपीग  मॉलमध्ये सोमालियन इस्लामी अतिरेक्यांनी कलेल्या गोळीबारात ५९ जणांचा नाहक बळी गेला . यामूळे मॉलच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे .  मॉल संस्कृतीचे बीज सर्वत्र रुजले जात आहे . मॉलमध्ये एकाच ठिकाणी सर्वच वस्तू मिळत . असल्याने  मॉलकडे दिवसेंदिवस तरुणांपासून वयोरुध्दांची संख्या वाढताना दिसत आहे . पर्यटक हि मॉल मध्ये जातात . तसेच एखाद्या वेळी दहशतवादी हल्ला झाल्यास काय केले पाहिजे . 
           प्रत्येक मॉलमध्ये खाजगी सुरक्षा एजन्सी कडून सुरक्षा केली जाते . तसेच सिसीटीव्ही कॅमरे ,सोबतच मॉलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही सुरक्षे कडे योग्यं प्रकारे लक्ष द्याला हवे सर्व सुरक्षा यंत्रे व्यवस्थित कार्य करत आहेत . कि नाही याकडे ही लक्ष दयाला हवे . यांच पाश्वभूमीवर काही वृत्तपत्रांनी , व दूरदर्शन वृत्तवाहिन्यांनी काही प्रमुख शहरातील मॉलची पाहणी केली यामध्ये असे आढळून आले की काही मॉलची सुरक्षा यंत्रणेत बिघाड आहे व सुरक्षेत हलगर्जीपणा केला जात आहे .  यामुळे मॉल मध्ये येणाऱ्या नागरिकांच्या जिवावरही   बेतू शकते व अशे  मॉल हे  दहशतवादी कारवाया करण्यास पूरक आहेत असे निष्पन झाले आहे . 

            
                                                            त्यामुळे मॉल च्या सुरक्षेचा प्रश्न फार गंभीर आहे यांची पोलिसांनी  व मॉल सुरक्षा अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य ती दखल घ्यावी तसेच त्यात्या विभागातील वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी मॉलच्या सुरक्षेची पाहणी करावी . ज्यामुळे हे मॉल सुरक्षित राहू शकतील.

No comments: