Tuesday, 7 October 2014

आपले स्वःताचे हि या देशाला काही तरी देणे


        


      प्रत्येक गोष्ठीसाठी दुसऱ्यानाच किती दिवस आपण दोषी ठरवणार आहे . हेच मला कळत नाही रस्ते चांगले नाही याला सरकार जबाबदार , भष्ट्रचाराला सरकारी अधिकारी जबाबदार , कचऱ्याला सफाई कामगार जबाबदार आपण हि या देशाचे नागरिक आहे. आपले स्वःताचे हि या देशाला काही तरी देणे लागते . याचे भानच सगळे विसरले आहे . फक्त वाईट कामासाठी दुसऱ्यावर बोटं ठेवायला पुढे असतात. पण चांगले काही झाले तर ते चांगले झाले बोलयला कोण तयार नसतं.
        किती दिवस दुसऱ्यांना दोष देत बसणार आहे. आज बाहेरील देशान कडे बघितल्यावर आपल्याला कळते कि आपण किती मागे आहोत आहो पण याला जबाबदार कोण आपणचन मग दोष कोणाला देणार.
            अस म्हणतात कि थेंब थेंब मिळून समुद्र बनतो मग आपल्या देशाला प्रगतीशील बनवण्यासाठी स्वच्छ बनवण्यासाठी आपले काही कर्तेव्य आहे कि नाही . प्रत्येकाला हे कळले तर बघा आपला देश हि किती सुंदर असेल. आज अनेक सामाजिक संस्था , सरकार अनेक उपक्रम राबवतात व स्वच्छतेचा संदेश देतात. मग आपण का असे मुर्खानसारखे वागतो . तरीही अजूनही वेळ गेली नाही . आपण आज पासून सुरुवात करू शकतो सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आपलं घर आपण जस स्वच्छं ठेवतो तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर हि स्वच्छं ठेवावा . मग बघा किती समाधान मिळेल तुम्हाला आणि मन हि प्रसन्न राहील व आरोग्य निरोगी .

No comments: