Tuesday, 7 October 2014

पर्यावरण विषयक आंदोलन

                     पर्यावरण विषयक  सर्वात शक्तिशाली चळवळ  म्हणून  "चिपको आंदोलन "  या  आंदोलनाचा उल्लेख केला जातो .  मानवी जीवनाच्या कलहात निर्माण झालेल्या धोक्याला दिलेली हि एक सुधारणावादी प्रतिक्रिया होय .  हिमालयाच्या दक्षिण टेकड्यांमध्ये वसलेल्या दुर्गम खेड्यांमध्ये तलागालाच्या पातळीवर हि पर्यावरणवादी चळवळ सुरु  झाली .  या खेड्यांमध्ये जंगलतोडीमुळे पुराचे प्रमाण वाढत  होते मात्र या खेड्यांतील लोकांना भव्यदिव्य हिमालयाबद्दल आदर होता . तिथे असणाऱ्या  जंगल संपत्तीचा अभिमान होता.

                     पहिले चिपको आंदोलन १९७४ साली हिमाचल प्रदेशातील गढवाल जिल्ह्यातील " रेनी "  नावाच्या खेड्यांत घडून आले . " गौरादेवीच्या " नेतृत्वाखाली व सुंदरलाल बहुगुणा यांच्या मार्गदर्शनाखाली खेडूंत  स्त्रियांच्या गटाने झाडांना मिठ्या  मारल्या . या स्त्रियांनी एका कारखान्याने नेमलेल्या भाडोत्री  लाकूड- तोडयांना  आव्हान देऊन सांगितले कि या झाडावर कुऱ्हाड चालवण्यापूर्वी आमचा अंगावर प्रथम चालवा . रेनी हे गाव अलकनंदा नदीच्या दरीत वसलेले होते . भविष्यात येणारे पूर आणि भूसंख्यालन यापासून स्वतःचे आणि आपल्या वनांचे संरक्षण करण्यासाठी स्त्रियांनी निदर्शना हि अभिनव पद्धत अवलंबली होती .                            
  ज्यावेळी मानवाचे जीवन आणि पृथ्वीवरील पर्यावरण या दोहोंच्या अस्तित्वाला धोका पोहचून इतिहासाला खरोखरच पूर्णविराम मिळतो कि काय अशी भीती वाटत होती त्याचवेळी चिपको आंदोलनाने जीवनाचा आधारभूत असलेल्या पर्यावरणाचा आणि जंगलतोडीमुळे ज्या मानवी समूहाला धोका निर्माण होतो . त्यांचे संवर्धन करून एक नवीन आशा निर्माण केली .

No comments: