Tuesday, 7 October 2014

एक घाव आणि चार तुकडे



      
     २०१४ ची महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक हि अनेक अर्थाने वेगळी आहे असे चित्र पूर्वी कधी हि पाहायला मिळाले नाही असेच आहे . कारण लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रात एक हाती सत्ता हि भाजपने काबीज केल्यानंतर महाराष्ट्रात हि भाजपला दिवसा स्वप्नं  पडायला सुरवात झाली आहे . युती आणि आघाडी तुटण्याचे मुख्य कारण हे राष्ट्रवादि कॉंग्रेस असल्याचे अनेक वृत्तवाहिन्यावर ऐकण्यास पडले . पण युती व आघाडी तुटन्यामागे नेमके काय कारण असेल ते त्यांचे त्यांनाच माहित.
          शिवसेना महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या नेतृत्वा विना हि त्याची पहिलीच निवडणूक आहे . या परिस्थितीत उद्धव ठाकरे कश्या प्रकारे कार्य करतात हे पाहण्या सारखे असेल कारण ज्या बाळासाहेबांवर मराठी जनतेने विश्वास ठेवून शिवसेना पक्षाला बळ दिले ते बळ उद्धव ठाकरे किती पेलू शकतात . मराठी अस्मितेच्या मुद्यावर कश्या प्रकारे निवडणूक लढवतात हेही पाहण्या जोगे असेल.
            महाराष्ट्रात जनतेला अनेक वर्ष युती व आघाडी असेच चित्र पहावयास मिळाले परंतु हि निवडणूक सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत . अश्या वेळी जनता कोणावर विश्वास ठेवेल हे पाहण्याजोगे असेल मोदीची हवाही कमी झाल्याचे चित्र आहे.
मनसे अजूनही आपल्या पक्ष प्रमुख सोडून एक हि म्हणावा असा ओळखीचा चेहरा देऊ शकला नाही त्यामुळे मनसेचे सर्व गणित हि राज ठाकरे वर अवलंबून आहेत . तर दुसरीकडे आघाडीचे दोन तुकडे झाल्यानंतर त्यांना हि निवडणूक अग्नी परीक्षे पेक्षा कमी नसणार नाही .

No comments: