Tuesday, 7 October 2014

Fandry चित्रपट निमिताने टीवी ९ वरील नागराज मंजुळे यांची मुलाखत

          नागराज मंजुळे यांच्या   मते  fandry  हि एका चळवळीची सुरुवात  असून ती जगण्याची गरज आहे . त्यांच्या  मते स्वप्न म्हणजे वास्तवाच्या विस्तवावर पाय ठेवणे  होय.त्याच्या मते चालण्यासाठी जमीन लागते. पटकथा लिहिताना त्यांना पुर्वानुभावाचा ठेवा  लागतो.  जगाला नष्ट करण्यासाठी अणुबॉम्ब निर्माण करण्यात आले आहेत परंतु जात नष्ट करण्यासाठी कोणीही निर्माण झालेला नाही . संपूर्ण चित्रपटामध्ये एकही गीत नसताना चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला  " तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला "  ह्या गाण्याबद्दल सांगताना नागराज मंजुळे सांगतात कि ते गीत त्या जब्याचे दुःख  व्यक्त करणारे गीत म्हणून तयार केले होते  परंतु रसिक प्रेक्षक त्या गाण्यावर आवर्जून ताल धरून नाचताना दिसतात म्हणजेच ते दुःखाच सेलिब्रेशन करणारे गीत झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही .
                        FANDRY  मधील कचऱ्या  आणि  त्याची  देशभक्ती  हे  चित्रपटातल्या  शेवटच्या भागावरून दिसून येते . FANDRY  ला आयता हातात आला असतानाच सुरु झालेल्या राष्ट्रगीतासाठी कचरू व त्याचा संपूर्ण कुटुंब FANDRY ला  सोडून राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी जागेवर उभे राहते . त्या भागातून कचऱ्याची  देशभक्ती दिसून आली . जो कचरू देशासाठी  हाताजवळ आलेली संधी सोडू शकतो तो देश कचऱ्याला समानतेची संधी नाही देऊ शकत हि  नागराज मंजुळेनी  कचरू आणि देश  यांच्यामधली विसंगती खेद व्यक्त करत सांगितली  . 
                    हजारो रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या FANDRY  ला  सर्वोत्कृष्ट चित्रपट , सर्वोत्कृष्ट नायक , सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक , सर्वोत्कृष्ट  बालकलाकार इत्यादी  यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले . तसेच मुंबई मधील म.टा. पुरस्कार , बंगळूर मधील GRAND ज्युरी  AWARD , लॉस एंजिलीस मधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म  यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले .

                    कार्यक्रमाची सांगता करताना  नागराज मंजुळे यांनी  भावी पिढीला जातीयता न पाळण्याचे , माणुसकी जपण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले .  FANDRY  च्या निमित्ताने फक्त इतकेच वाटते कि  देशामध्ये चाललेले जातीय वाद  , अत्याचार  नष्ट व्हावेत . प्रत्येकाला प्रगती करण्याचे अधिकार मिळाले पाहिजे . जेव्हा माणसाचा विकास होईल तेव्हाच देशाचा विकास होईल .

No comments: