Tuesday, 7 October 2014

मोदीनि सत्ता प्रस्तापित केली ते खरचं जनतेचे पंतप्रधान



ज्या प्रकारे २०१४ च्या लोकसभा निवडणुका  मध्ये मोदीनि सत्ता प्रस्तापित केली ते खरचं
जनतेचे पंतप्रधान आहे असे भारतीय जनतेला वाटत असेल .
          आज पर्यंत जेवढे पंतप्रधान भारतात होऊन गेले त्यामध्ये इंदिरा गांधी वगळता कोणत्याही
पंतप्रधानाची लोकप्रियता येवढी नसेल जेवढी आज नरेद्र मोदी यांची आहे . त्यांचे भाषण
 
हे भावनिक करणारे असले तरीही त्यांचे नेतृत्व  हे वाखन्या जोगे आहे . ज्या प्रकारे तीन वेळेला सतत गुजरातचे मुख्यमंत्री राहिल्या नंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून भाजपणी त्यांच्यावर विश्वास ठेवून निवडणूक लढली त्या त्यांच्या पक्षाला हि अभिमान असेल कि असा नेता त्यांना भेटला पण फारच कमी वेळेत त्यांनी देशवासियांन सोबतच अनिवासी भारतीयांचीहि मने जिंकली आहेत . पंतप्रधान झाल्यानंतरचे १५ ऑगस्ट चे भाषण , मंगळयांनाच्या यशस्वी मार्गक्रमना नंतरचे इस्रो मधील भाषण व अमेरीकेमधील मेडिसन स्वेअर ला केलेले भाषण यामुळे त्यांनी देशवासियान सोबतच अनिवासी भारतीयाची मने जिंकली आहे .
       मेकिंग इन इंडिया , स्वच्छ भारत अश्या उपक्रमान मुळे खरच असे वाटत आहे कि पंतप्रधानाला देशातील जनतेचे व देशासाठी काही तरी करण्याची प्रबळ इच्छा आहे . त्याचं बरोबर मित्र राष्ट्रासाठी उपग्रह निर्माण करण्याची त्यांची इच्छा यामुळे असे वाटते कि २१ व्या शतकात भारत एक महासत्ता होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. असेच कार्य ते करत राहोत हीच प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे . टीका करणारे तर करत रहाणार परंतु कधी तरी एखादा प्रमाणिक व प्रबळ इच्छा शक्ती असलेला खंभीर पंतप्रधान भारताला लाभला आहे याचेच समाधान वाटते .

आपले स्वःताचे हि या देशाला काही तरी देणे


        


      प्रत्येक गोष्ठीसाठी दुसऱ्यानाच किती दिवस आपण दोषी ठरवणार आहे . हेच मला कळत नाही रस्ते चांगले नाही याला सरकार जबाबदार , भष्ट्रचाराला सरकारी अधिकारी जबाबदार , कचऱ्याला सफाई कामगार जबाबदार आपण हि या देशाचे नागरिक आहे. आपले स्वःताचे हि या देशाला काही तरी देणे लागते . याचे भानच सगळे विसरले आहे . फक्त वाईट कामासाठी दुसऱ्यावर बोटं ठेवायला पुढे असतात. पण चांगले काही झाले तर ते चांगले झाले बोलयला कोण तयार नसतं.
        किती दिवस दुसऱ्यांना दोष देत बसणार आहे. आज बाहेरील देशान कडे बघितल्यावर आपल्याला कळते कि आपण किती मागे आहोत आहो पण याला जबाबदार कोण आपणचन मग दोष कोणाला देणार.
            अस म्हणतात कि थेंब थेंब मिळून समुद्र बनतो मग आपल्या देशाला प्रगतीशील बनवण्यासाठी स्वच्छ बनवण्यासाठी आपले काही कर्तेव्य आहे कि नाही . प्रत्येकाला हे कळले तर बघा आपला देश हि किती सुंदर असेल. आज अनेक सामाजिक संस्था , सरकार अनेक उपक्रम राबवतात व स्वच्छतेचा संदेश देतात. मग आपण का असे मुर्खानसारखे वागतो . तरीही अजूनही वेळ गेली नाही . आपण आज पासून सुरुवात करू शकतो सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आपलं घर आपण जस स्वच्छं ठेवतो तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर हि स्वच्छं ठेवावा . मग बघा किती समाधान मिळेल तुम्हाला आणि मन हि प्रसन्न राहील व आरोग्य निरोगी .

Thursday, 10 October 2013

मॉल चे हाल " बेहाल "

           केनियाच्या नैरोबि येथील एका शॉपीग  मॉलमध्ये सोमालियन इस्लामी अतिरेक्यांनी कलेल्या गोळीबारात ५९ जणांचा नाहक बळी गेला . यामूळे मॉलच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे .  मॉल संस्कृतीचे बीज सर्वत्र रुजले जात आहे . मॉलमध्ये एकाच ठिकाणी सर्वच वस्तू मिळत . असल्याने  मॉलकडे दिवसेंदिवस तरुणांपासून वयोरुध्दांची संख्या वाढताना दिसत आहे . पर्यटक हि मॉल मध्ये जातात . तसेच एखाद्या वेळी दहशतवादी हल्ला झाल्यास काय केले पाहिजे . 
           प्रत्येक मॉलमध्ये खाजगी सुरक्षा एजन्सी कडून सुरक्षा केली जाते . तसेच सिसीटीव्ही कॅमरे ,सोबतच मॉलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही सुरक्षे कडे योग्यं प्रकारे लक्ष द्याला हवे सर्व सुरक्षा यंत्रे व्यवस्थित कार्य करत आहेत . कि नाही याकडे ही लक्ष दयाला हवे . यांच पाश्वभूमीवर काही वृत्तपत्रांनी , व दूरदर्शन वृत्तवाहिन्यांनी काही प्रमुख शहरातील मॉलची पाहणी केली यामध्ये असे आढळून आले की काही मॉलची सुरक्षा यंत्रणेत बिघाड आहे व सुरक्षेत हलगर्जीपणा केला जात आहे .  यामुळे मॉल मध्ये येणाऱ्या नागरिकांच्या जिवावरही   बेतू शकते व अशे  मॉल हे  दहशतवादी कारवाया करण्यास पूरक आहेत असे निष्पन झाले आहे . 

            
                                                            त्यामुळे मॉल च्या सुरक्षेचा प्रश्न फार गंभीर आहे यांची पोलिसांनी  व मॉल सुरक्षा अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य ती दखल घ्यावी तसेच त्यात्या विभागातील वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी मॉलच्या सुरक्षेची पाहणी करावी . ज्यामुळे हे मॉल सुरक्षित राहू शकतील.

Tuesday, 27 August 2013

एंड्राइड फोन मधील मराठी पुस्तके